गुरुसेवा करणे म्हणजे काय?
-------------------------------
गुरुसेवा म्हणजे काय नाही?
- त्याच्या देहाची सेवा करणे.
- प्रपंचातल्या विषयांसाठी त्याची सेवा करणे.
- उगीचच अभिमान वाढविणार्या साधनांची आटाआटा (धडपड) करणे.
- पापकर्म करीतच राहणे.
- आपल्या गुरुचे मनच न कळणे.
- त्याने सांगितलेले न ऐकता आपल्याच मनाने वागणे.
- मला सगळे कळते असे वाटणे.
-------------------------------------------
गुरुसेवा कशी करावी?
- जे जे घडते ते ते गुरुच्या इच्छेने झाले असे समजावे आणि त्यात आनंद मा्नावा.
- जी जी गोष्ट करू त्यात आपल्या सद्गुरुला आठवावे
- गुरु सांगेल तसे वागावे.
- त्याच्या जवळ राहून मनुष्यदेहाचे सार्थक होईल असे करावे.
- आपल्या सद्गुरुशी आपली वृत्ती एकरूप करावी.
- गुरुला अनन्यशरण जाणे इतके की त्याचे मन आणि आपले मन एक व्हावे.
- गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी मनाने संलग्न असावे.
- आपल्या आईशी बोलावे तसे आपल्या गुरुशी बोलावे. आपले दुःख त्यांना सांगावे.
- जे त्याच्याजवळ मिळेल ते जगात कुठेही मिळणार नाही.
- आपला गुरु भेटावा असे वाटत असेल तर नामाचे प्रेम लागावे.
॥श्रीराम समर्थ॥