सद्गुरुची कामगिरी
-----------------------
सर्वसामान्य माणूस -
- देह हा त्याचा रथ आहे.
- हा रथ माणूस आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यात पडतो.
- या रथाला गाडीवान नाही.
- सुखवस्तू माणूस मी स्वस्थ आहे म्हणतो पण त्याचे मन गिरक्या मारत असते..त्यामुळे तो खरा स्वस्थ नसतो.
----------------------------------
सद्गुरुचे महत्व -
- सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात, आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात.
- ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु.
- जे चिरकाल टिकते ते गुरुपद.
- सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय.
- संत कुणाला देहाने कायमचे लाभले नाहीत.
- संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्वाचा आहे.
- संतांची गाठ पडूनही सत्संगतीचे महत्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो फायदा व्हायला हवा तो होत नाही.
- शिष्याच्या मनाच्या आरशावर जो धुळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरु सांगतात.
- सद्गुरु शिष्याला त्याचे कोठे चुकते ते सांगतात.
- सद्गुरु त्याला मार्गाला लावतात.
- सद्गुरु शिष्याला जागे करण्याचे का्म करतात.
- जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरु उचलतो.
------------------------------------------------------
शिष्य कसा असतो? त्याने काय करावे?
- "मला करायचे काही उरले नाही" असे ज्याने म्हणले, त्याने सद्गुरु खरोखर केला.
- शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात.
- गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन.
- शिष्याने करायचे कर्तव्य सद्गुरु त्याला दाखवून देतात.
- शिष्याने नेहेमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे.
- गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे, मग कसलाच धोका उरणार नाही.
- आपल्या नशीबात असेल तेवढेच आपल्याला मिळणार, अशी वृत्ती बनून शिष्याचे हवेनकोपण कमी होते.
- मनाची ही वृत्ती झाली की, जे घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडेल असे शिष्याला वाटू लागते. असे वाटू लागले की समाधान घरी चालत येते.
- हे सगळे होण्याआधी आपल्या अंतःकरणाची शुध्दता करून पाया पक्का करावा.
॥श्रीराम समर्थ॥