देह हा देवाच्या प्राप्तीकरीता आहे.
------------------------------------
भगवंत -
- आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे.
- भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे.
------------------------------------------
मारूति -
- मारूति हा चिरंजीव आहे.
- ज्याची जशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल.
- मारूतिला सर्व सृष्टी रामरूप दिसली, हेच खरे भक्तीचे फळ आहे.
जसा मारुतिमध्ये देव-अंश होता, तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलवला, आपण तो झाकून विझवून टाकला.
- मारूतिचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तर्हा या गोष्टी आपण शिकाव्यात.
------------------------------------------------
संत -
- आपण चुकीची वाट चालत असताना, "अरे तू वाट चुकलास" अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात.
- ते सदासर्वदा समाधिसुख भोगीत असतात, आणि नेहेमी भगवंताविषयी सांगत असतात.
- भगवंताच्या लीला पहाणार्यांनाच खरा आनंद मिळतो.
- सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आःए अशी त्यांची पक्की खात्री असते, त्यांचे द्वैत नाहीसे होऊन एकाग्रता झालेली असते - तीच खरी समाधी.
---------------------------------------
साधकाने काय करावे?
- विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी.
- "मी मनाने भगवंताकरीता आहे" असे समजावे.
- देहाला विसरलं की उपास्यमूर्तीमध्ये जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल.
- "माझ्या देवाला हे आवडेल का?" अशा भावनेने जगात वागावे.
- भगवंत दाता आहे, तो आपल्या मागे आहे, ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होईल व आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल.
- समाधान व आनंद हीच खरी लक्ष्मी होय.
- आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असल्यास त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. आनंद देऊन कधीच संपत नाही.
॥श्रीराम समर्थ॥