५ जुलै

आपली सुखदुःखे श्रीरामाला सांगा.
-----------------------------------
परमेश्वराकडे जाण्याचे दोन मार्ग -

१) श्रध्देचा - हा पायवाटेचा कमी अंतराचा थे. इथे सद्‌गुरु वाट दाखवतात त्यामुळे चुकण्याचा संभव नाही.
२) अनुभवाचा - हा मोटारीचा लांबचा मार्ग आहे. वाटेतल्या अडथळ्य़ाने प्रगती खुंटते.
----------------------
परमेश्वर कसा आहे?

- तो फार मोठा आहे, अमर्याद आहे.
- तो भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो.
- एरव्ही तो त्याच्याजवळच असतो.
-------------------------------
परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असेल तर काय करावे?

- परमेश्वराची सतत सेवा करीत राहावं, कुणी त्याविरुध्द काही म्हणलं तरी त्याकडे लक्ष देऊ नये.
- परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे.
- परमेश्वराला पाहायला सेवाही फार मोठी करावी लागते.
- त्याला पहायला तशी मोठी शक्ती आपल्याला लागेल.
- भक्तीची प्रगती ही खरी शक्ती आहे. मोठ्या शक्तीने आपल्यालाही दिव्य दृष्टी येईल.
- शक्ती येण्यासाठी अखंड नामस्मरण हेच खरे साधन आहे.
- श्रीरामप्रभू आपल्याच घरातला कोणी आहे याबद्दल खात्री बाळगावी.
- त्याला आपली सुखदुःखे सांगावीत.
- दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्यभावाने शरण जावे, असे केल्याने दिवस आनंदात जाईल आणि दुःख दूर होईल.
- आपले ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता परमेश्वरापुढे काहीच नाहीत.
- या सर्वांचा विसर पडून त्याला शरण जावे.
- रामापाशी त्याचे प्रेम मागावे", देवा, आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे आहे, तुझे आम्हाला खरे दर्शन घडव. आम्ही अवगुणसंपन्न असू, तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही, परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढे देवा, कितीही संकटे येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदात भोगू. जे काही व्हायचे असेल ते होऊ दे, आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे."
- सद्‌गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रध्देने आणि प्रेमाने नाम घ्यावे.

॥श्रीराम समर्थ॥