६ जुलै

आपल्याला सद्‌गुरुचा आधार वाटावा.
---------------------------------------
संत कसे असतात?

- संतांमध्ये अहंकार जिवंत राहत नाही, कारण "परोपकार" करायला लागणारा "पर" च ठिकाणावर नसतो, त्यामुळे "दुसर्‍याकरीता मी काही केले" ही भावना व्हायला आधारच राहत नाही.
- संत कधीकधी आपल्याला विषय देतात हे खरे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
------------------------
संतसंगती कशी करावी?

- तीर्थयात्रा व साधुसंतांची भेट या निमित्ताने आपल्या अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होते.
- विषयाच्या लालसेने संतसमागम करू नये.
- संताच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुध्द भाव येईल.
- भगवंताच्या नामातच संतसंगती आहे.
- आपण असद्‌गुरुचे आहोत असे छातीठोकपणे सांगत चला.
- आपले सद्‌गुरु आपल्या मागेपुढे आहेत अशी दृढ भावना असावी.
----------------------------------------------
साधकाने काय करावे?

- वेळप्रसंग येईल तसे उचित वागावे, आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये.
- परमात्म्याच्या चीतनात मन गुंतवावे, म्हणजे त्याच्यावर अवांतर गोष्टींचा परिणाम होत नाही.
- जेवढे झेपेल तेवढेच करावे.
- अभ्यास करावा, पण काळजी न करता करावा.
- सर्वस्वी भगवंतावर भार ठेवून असावे.
- आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडून न देता आनंदात रहाए.
- परमात्म्याकडे वृत्ती लावली म्हणजे आपली वृत्ती आवरते.
- रामैच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे.
- संकट व आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत.
- ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे.
- परमेश्वराच्या ठिकाणी अनन्यभावाने शरण जाण्याची बुध्दी व्हावी. एकदा शरण गेल्यावर आपण उरत नाही ..यालाच शरणागति म्हणतात. शरणागती ही परमार्थातली श्रेष्ठ गती आहे.
---------------------------------------------
महाराजांचे विशेष सांगणे -

- मला सुख-दुःख दोन्ही नाहीत; पण तुम्ही दुःखी झालात की मला दुःख होते. तेव्हा तुम्ही मनाला दुःख होणार नाही असे वागा.
- प्रपंची माणसाच्या दुःकःआची मला पूर्ण जाणीव आहे, ती जाणीव ठेवून "भगवंताचे नाम घ्या" असे मी तुम्हाला सांगतो.
- जे मी सुरुवातीला सांगितले तेच शेवटी सांगतो..तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका.

॥श्रीराम समर्थ॥