७ जुलै

अभिमानी माणूस -

- भक्तिमार्गी लोकांना नावं ठेवतो.
- तोंडानं तत्वज्ञान बोलतो पण तसे आचरण करीत नाही.
- त्याचे "शहाणपण" त्याच्या प्रगतीच्या आड येते.
- तो म्हणतो ", माझी आणि भगवंताची ओळख नाही, तर त्याची पूजा मी कशी करू?"
- तो म्हणतो" देव माझा आहे".
--------------------------------------
भक्तिमार्गी साधकाने श्रध्देने भक्ती कशी करावी?

- दुसर्‍याला वावे ठेवू नयेत.
- आपल्या कर्माला भगवंताचे अधिष्ठान असावे.
- भगवंताला ओळखून उपासना करावी.
- संतांनी सांगितलेले निमूटपणे करावे.
- मूल होऊन भगवंताला ओळखावे.
- अखंड जागृत रहाण्यासाठी देहाने प्रपंच करावा पण आपले मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करावे. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही.
- "मी देवाचा आहे" असे म्हणावे, म्हणजे श्रध्दा उत्पन्न होते.
- साधन श्रध्देने करावे.
- एक देहबुध्दी काढून टाकावी म्हणजे मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतील.
- देहबुध्दीच्या पलिकडे गेल्यावर आत्मज्ञान होते, ते झाले की पूर्ण समाधान मिळते. हेच खरे भगवंताचे दर्शन.

॥श्रीराम समर्थ॥