८ जुलै

भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे?
--------------------------------------
सर्वसामान्य माणसाला कशाचे अनुसंधान असते?

- देहाचे (स्वतःच्या नावाचे)
- अत्यंत आवडणार्‍या गोष्टीचे
- कामाच्या व्यापाचे.
----------------------------------
अनुसंधान म्हणजे काय?

- एखाद्या गोष्टीवर आत्यंतिक प्रेम असणं.
- आपल्याला त्याचे अनुसंधान आहे याचीही जाणीव नसणं.
- त्या प्रेमाच्या वस्तूशी एकजीव होऊन जाणं.
----------------------------------------
साधकाने भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे?

- हा एक प्रकारचा अभ्यास आहे. भगवंताचे प्रेम वाढले की अनुसंधान टिकते.
- भगवंताचे प्रेम वाढवण्यासाठी " जे जे काही मी करेन ते ते मी भगवंताच्या साक्षी ने करेन" ही जाणीव ठेवावी.
- सर्व व्याप सांभाळताना भगवंताचे स्मरण ठेवून करावे.
- कोणतीही गोष्ट करताना भगवंत काय म्हणेल याचा विचार जास्त करावा, लोक काय म्हणतील नाही.
- भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याणे त्याला हवे तेच आपल्या हातून घडेल.
- भगवंताचे अनुसंधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे.
- हे अत्यंत प्रेमाने हवे.

॥श्रीराम समर्थ॥