नाम घेण्याचा निश्चय करावा.
----------------------------------
दृश्य संसार -
- जे दिसते ते आज ना उद्या नाश पावते.
- दृश्य स्वतंत्र नसते. ते भगवंताच्या अधीन असते.
- जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेने घडते.
- आपल्या दृश्य देहात तो चालवणारा भगवंत असतो.
-----------------------------------
भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे?
- नाम घेण्याचा निश्चय करावा.
- आपले चित्त नामात गुंतवावे आणि देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करावा.
- व्यवहाराच्या मार्गाने जाताना भगवंताचे नाम कधी विसरू नये.
- आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून, जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे.
- प्रपंचाला उचित प्रयत्न केल्याशिवाय राहू नये.
- प्रपंच हे सर्वस्व मानून, भगवंताला विसरू नये.
- उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये.
- अनीती-अधर्माच्या वाटेला जाऊ नये.
- संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून, मुखात नाम ठेवावे.
- सदाचरणाने वागून प्रपंच करावा.
- प्रपंचासाठी देव न मागता, देवासाठी देव मागावा.
-----------------------------------------------
खरा संत (सद्गुरु) -
- अगदी विषयातल्या माणसाला सुध्दा जो बाहेर काढतो तो खरा संत.
- त्याच्याजवळ जाऊन नुसते "मी शरण आलो आःए" असे म्हतले तरी पुरे होते.
---------------------------------------
महाराजांचे वचन -
- जो माझे ऐकेल व तसे वागेल त्याचे कल्याण राम खात्री करेल.
- मला जी गोष्ट आवडते ती तुम्ही आवडावी.
- मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा.
- कशाचीही काळजी करू नका, मी तुमचा भार घेतला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा.
॥श्रीराम समर्थ॥