१० जुलै

सद्‌गुरुस जावे शरण । संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम ॥
---------------------------------------------------------------
रघुपती कसा आहे? त्याला काय आवडते?

- ज्याचे अंतःकरण शुध्द आहे, ज्याचे आचरण शुध्द आहे, परमात्म्याबद्दल ज्याची वृत्ती शुध्द आहे, त्याच्यापासून दूर रघुपती राहत नाही (त्याच्याजवळ राहतो).
- जेथे नामात प्रेम आहे, तेथे पुरुषोत्तम प्रकटतो.
-----------------------------------------------------
विरक्ती (वैराग्य) आणि विवेक म्हणजे काय? त्यांचे महत्व काय? तो आपल्या अंगी कसा येईल?

- खरी विरक्ती म्हणजे राम ज्या स्थितीत ठेवील, त्यात ज्याची वृत्ती समाधान राखते, ती वृत्ती म्हणजे विरक्ती.
- जी वृत्ती रामाआड जे जे आहे, त्यापासून आपल्याला दूर ठेवते तिच्यामुळे विवेकाची प्राप्ती होते.
--------
साधकाने काय करावे?
- आपली वृत्ती फार विषयी होऊ देऊ नये.
- चित्ती रघुवीर चिंतावा.
- विषयाकार वृत्ती होऊ लागली की तेथे सारासार विचार राहत नाही. अभिमान बळावतो, अनुसंधान राहत नाही. म्हणून जे जे पाहावे ते ते रामच आहे अशी वृत्ती ठेवावी. एक रघुनंदन चित्ती आणावा.

॥श्रीराम समर्थ॥ -