सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह
----------------------------
सत्पुरुष कसे असतात?
- संतांचा देह भक्ताचे काम करीत नाही. त्याचे परमात्मस्वरूप काम करते.
- शरण आलेल्या भक्तांच्या प्रापंचिक व पारमार्थिक बाबतीत सत्पुरुषाची सत्ता असते.
- भक्ताच्या प्रारब्धामध्ये सत्पुरुष शक्यतो ढव्ळाढवळ करीत नाहीत. मात्र कल्याण होईल इतकी ढवळाढवळ करतात.
- परमार्थाच्या बाबतीत मात्र सत्पुरुषाची पूर्ण सत्ता असते.
- संत अत्यंत दयाळू असतात.
- सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो.
- तो देहाने या जगात राहतो असे जरी दिसले तरी अंतर्यामी भगवंतापाशीच असतो.
- सत्पुरुषाला त्याच्या लक्षणांवरुन ओळखू येत नाही. पुस्तकांत दिलेल्या लक्षणांच्या पलिकडे संत असतात.
------------------------------
भक्तांच्या साधनेमध्ये येणारे अडथळे -
- सत्पुरुषाने सांगितलेल्या साधनाविषयी शंका घेणे.
- दुसर्याला अमुक दिवसांत साधले, मला अजून का साधत नाही असा विचार मनात येणे
- सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे.
- सत्पुरुषाकडे जगातल्या वस्तूविषयीची वासना घेऊन जाणे.
----------------------------------
भक्ताने काय करावे?
- सद्गुरुने सांगितलेल्या साधनात राहून, त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागावे.
- एकदा त्याच्या पायांवर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणार्या गोष्टी त्याच्या इच्छेने घडत आहेत अशी भावना ठेवावी.
- आपले कर्तव्य करीत त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहावे.
- त्याला ओळखायचे असेल तर भगवंताचे प्रेम आवश्यक आहे.
भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे. ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा!
॥श्रीराम समर्थ॥