सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे.
-----------------------------------
सामान्य प्रपंची माणूस परमार्थ कसा करतो?
- जी सत्कर्मे करेल त्यापासून मोबदला काय मिळेल याचा विचार करतो.
- तो केवळ कर्मे केले पाहिजे म्हणून करतो, त्याला देव आवडतोच असे नाही.
- त्याच्या सत्कर्मांनी त्याचा अहंभाव अधिक वाढतो.
---------------------
साधकाने काय करावे?
- भक्ती निरपेक्ष असावी.
- सद्गुरुने सांगितलेले साधन प्रामाणिकपणे व संशयरहित होऊन करावे.
- व्यवहार सोडूही नये आणि त्यात गुंतूही नये.
- आपले जीवन एकदा सद्गुरुच्या ताब्याट दिल्यावर, तो सांगेल त्याप्रमाणे वागावे.
- साधकाची भगवंताची गरज सद्गुरु त्याचे "नाम" देऊन भागवितात. हे नाम साधकाने निरंतर आणि श्रध्देने घ्यावे.
- नामात अखंड राहिले की परमार्थसाधतो, भगवंताची गरज भाघते आणि प्रपंचात समाधान मिळते..आणि जन्माचे सार्थक होते.
॥श्रीराम समर्थ॥