१३ जुलै

देव आणि नाम भिन्न नाहीत.
--------------------------------
सर्वसामान्य साधक व बिनानिष्ठेचे नामस्मरण -

- पुष्कळ गोष्टी वाईट आहेत हे कळून सुध्दा त्या टाळत नाही.
- जे अनुभवाला येते ते आचरणात आणत नाही.
- नाम मनात काही वासना इच्छा ठेवून घेतो.
- अशा लोकांचे परमेश्वरावाचून नडत नाही. त्याच्या आधाराशिवाय आपण जगू शकतो असे त्याला वाटते.
- त्यामुळे त्याने केलेले नामस्मरण निष्ठेचे नसते.
--------------------------------------------
संतांचे महत्व -

- जगातले सुख हे खरे सुख नाही, दुःखानेच सुखाचा घेतलेला तो वेष आहे असे त्यांच्या अनुभवाला आले. तेव्हा त्यांनी सुखाकडे पाठ फिरवली आणि खर्‍या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वरप्राप्तीतच खरे सुख आहे असे त्यांना आढळून आले. त्या प्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम.
- त्यांच्या अनुभवाला जे आले, ते त्यांनी आचरणात आणले. म्हणून ते संतपदवीला गेले.
- सद्‌गुरुकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले, तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला.
-------------------------------
नामाचे महत्व -

- देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीत; नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम एकदा मुखात आले की देव हातात आलाच. (नाम म्हणजे दोरी, देव म्हणजे पतंग)
- जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे, ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला.
- परमेश्वरच आपल्या जीवनाचा खरा आधार आहे, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, अशी वृत्ती बाणल्यावर जे नामस्मरण होते ते खरे नामस्मरण.
--------------------------
साधकाने "निष्ठेचे नाम" कसे घ्यावे?

- कोणतीही वृत्ती उठू न देता नामस्मरण करावे.
- परमेश्वरावाचून आपले नडते असे वाटावे.
- परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व असे समजून नाम घ्यावे. तरच जीवनाचे सार्थक होते.

॥श्रीराम समर्थ॥