१४ जुलै

गुरू सांगेल तेच साधन.
------------------------
परमार्थ म्हणजे काय? तो कसा करावा?

- आसक्ती सोडून प्रपंच करणे.
- ज्याने आपल्याला हा प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजावे म्हणजे त्याबाबत सुखदुःख बाधत नाही.
- हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे.
- परमार्थ सोपा आहे, तो सहज करता येतो.
- प्रपंच परमार्थासाठीच असतो.
------------------------
गुरू कोणाला करावे? गुरुपद म्हणजे काय?

- जिथे आपले समाधान होते त्याला गुरू समजावा. गुरुपद कुठेही एकच असते. लौकिक आडनावे वेगळी असली तरी गुरूपद सर्वकाळी अबाधित असते.
-----------------------
गुरूकृपेने परमार्थ कसा साधावा?

- गुरूच्या देहाकडे पाहू नये.
- तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहावे.
- त्याची लाज, जिथून गुरुपद निर्माण झाले, त्याला असते.
- गुरुआज्ञा हाच परमार्थ; तो सांगेल तेच साधन.
- तुम्ही तुमच्या मनाने ठरवून करू लागलात, तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही.
- अभिमान सोडून गुरुकडे जावे. तो सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवावे.
- परमार्थात आपली वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व आहे.
- कोणत्याही परिस्थितीत आपली वृत्ती स्थिर असावी.
- मनाचे संयमन व भक्तीचा जोर याने परमार्थ लवकर साधतो.
- देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून, मनाने ईश्वरोपासना करावी.
-----------------------------------------
शिष्याने काय करू नये?

- लोकांना उपदेश करू नये.
- आपला परमार्थ जगाला कमीत कमी दिसावा.
- जगातल्या मोठेपणात सार्थकता मानू नये.

॥श्रीराम समर्थ॥