गुरुआज्ञापालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरत नाही.
----------------------------------------------------
एकदा गुरु केल्यावर शिष्याने कसे वागावे?
- आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावे.
- निर्गुण परमात्मा जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला हवे - म्ह्णून देहबुध्दी सोडावी.
- परमात्मरूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त करावे. आपण पूर्ण निष्पाप झालो तर आपल्याला जगात पाप दिसणार नाही.
- देवाच्या नामाने भगवंत जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहावे; त्यातच सर्व सुख सामावले आहे.
----------------------------------------------
महाराज आपल्या शिष्यांना काय सांगतात?
- ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटला, त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरूवर सोपवून तुम्ही मोकळे झाला; गुरुआज्ञापालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही.
- मी सुखाचा शोध घेतला, आणि ते मला सापडले. म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो म्हणजे - "भगवंताचे अनुसंधान".
- मी अत्यंत समाधानी आःए, तसे तुम्ही समाधानी राहा.
- जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो : तुम्ही कसेही असा, पण तुम्ही भगवंताच्या नामाला सोडू नका.
- अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरे काय मिळवायचे?
॥श्रीराम समर्थ॥