गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे.
-------------------------------------------------
मनुष्यदेहाचे कर्तव्य -
- "परमात्म्याची ओळख करून घेणं" हेच एक निश्चित कार्य घेऊन आपण जन्माला आलो आहोत हे समजणे.
-------------------------------------------
बहुतांशी,बहुतेक लोक हे कर्तव्य का करीत नाहीत?
- लोक विषयात (परमेश्वर सोडून सर्व) पडलेले असतात.
- विषयातच सुख मिळेल अशी आशा करीत राहतात.
- विषयातच आनंद मानतात.
- परमेश्वराची गरज त्यांना भासत नाही, भासलीच तर विषयप्राप्तीसाठी लागते.
-------------------------------------
गुरु काय करतो?
- विषय खोटे आहेत, त्यात सुख मिळणार नाही हे दाखवतो.
- गुरु नाम हेच सत्य असे सांगतो. नामस्मरणाला आणखी दुसर्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो.
-------------------------------------------
शिष्याने काय करावे?
- विषयापासून विरक्त झालो तरच भक्ती करता येईल हे ध्यानात घ्यावे.
- गुरु सांगेल तसे वागणे यातच आपले हित आहे हे लक्षात घ्यावे.
- दुसरेच काही केले तर त्याचे कष्ट व्यर्थ जातात.
- गुरुने सांगितलेले साधन हलके मानले तर त्याला गौणपणा दिल्यासारखे होते..मात्र इतर काही खटपट फारशी उपयोगाची नसते..हे समजावे.
- गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे, ही भावना दृढ व्हावी.
- त्याच्या वचनावर विश्वास असावा.
- गुरु सांगेल तेच साधन खरे असे वाटावे.
- हे साधन निष्ठेने पाळावे. ते सोडून दुसरे साधन नाही असे वाटावे.
- गुरुशी अनन्यतेने वागावे, त्याची आज्ञा प्रमाण मानावी. त्यामुळे आपल्याला सुख होते.
- आपल्या सर्व अपेक्षा भगवंताकडे लावाव्यात. असे केल्याने खात्रीने सुख मिळते.
॥श्रीराम समर्थ॥