साक्षित्वाने राहाणार्याला दुःखाची बाधा नाही.
------------------------------------------------
देहबुध्दी -
- "मी देही आहे (देह म्हणजे मी)" ही भावना असणे.
- ही असताना काळजी राहते.
- काळजी मनात असते.
- परमेश्वराच्या अस्तित्वाविषयीचा संशय जोपर्यंत फिटत नाही आणि त्याचा आधार वाटत नाही तोपर्यंत काळजी वाटते.
- कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंत असते. त्यात पैसा, भगवंताकडचा कल इ. सांगता येतं, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येत नाही.
- एकवेळ जग जिंकता येते पण स्वतःला जिंकता येत नाही.
--------------------------------
मनुष्यजन्माचे कर्तव्य -
- भगवंताच्या प्राप्तीविना मनुष्यजन्म गेला तर जिवाचे फार नुकसान होते.
- भगवंताच्या प्राप्तीची तळमळ लागावी. या तळमळीने माणूस वेडा होतो, आणि कोणी संत भेटला की निवांत होतो.
------------------------------------
संतांचे महत्व -
- संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत, तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात.
- "आपल्याला जे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या." हा संतांचा एकच हेतू असतो.
- संत विषयावर मालकी गाजवतात.
- संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात.
- संत साक्षित्वाने जगात राहतात, त्यामुळे त्यांना दुःखाची बाधा होत नाही.
---------------------------------------
शिष्याने कसे वागावे?
- संतांच्या आज्ञेचे पालन करावे. त्याने संशय दूर होतात व समाधान मिळते.
- समाधानी राहण्यासाठी फार धडपड करू नये. जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावे.
- कचेरीचे विचार घरी आणू नयेत. ते तिथेच ठेवावेत.
- झालेल्या गोष्टी विसरून जाण्यात खरा आनंद आहे मात्र भगवंताच्या स्मरणात राहिल्यानेच ते खरेतर होते.
- म्हातारपणी आनंद हेच औषध आहे.
- ज्याचा आनंद कायम टिकला, त्याच्याच जन्माचे सार्थक झाले.
॥श्रीराम समर्थ॥