साधनाची चार अंगे.
---------------------
चित्तशुध्दीसाठी काय करावे?
- प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावेत आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. आपले अवगुण आपल्याला डोंगराएवढे दिसावेत.
- दुसर्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये.
- रोज निजण्याच्या वेळेस, आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसर्याच्या निंदेत किती वेळ घालवला याचा पाढा वाचावा.
- असे केले की तीन महिन्यात चित्तशुध्दी होईल.
- संतांच्या ग्रंथांचे वाचन विश्वासाने करावे म्हणजे त्यांचा सहवास घडेल. (सध्या खरे संत सापडणे कठीण झाले आहे.)
- संतांना देहात पाहण्यापेक्षा त्यांनी सांगितलेल्या शाधनात त्यांना पहावे.
- परमात्मप्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे.
--------------------
संतांनी सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टी -
१) सगुणोपासना - निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी. त्यानेच निर्गुणरहस्य कळेल.
२) नम्रता - अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी नम्रपणे वागलं तर भगवंताला आपण प्रिय होतो.
३) अन्नदान - कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जाए. त्याचे महत्व फार आहे.
४) अखंड नामस्मरण - नामस्मरण अखंड करावे.
संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटू नये.
त्यानेच गुरु भेटल्याचे शार्थक होते.
गुरुआज्ञेपरते साधन नसते. तोच परमार्थ आणि तीच तीर्थयात्रा.
॥श्रीराम समर्थ॥