२० जुलै

नामातच राहे समाधान । ही सद्‌गुरुची आहे खूण ॥
-------------------------------------------------------
साधकाने राम कसा जोडावा?

- रामापायी मन ठेवावे.
- रामापायी भाव ठेवावा.
- रामाला अनन्यशरण जावे.
- रामरूपी चित्त ठेवावे.
- रामाला प्रार्थना करावी," तुमच्या नामामध्ये माझे मन लागावे"
- नामात चित्त असावे.
- नामाशिवाय मन तळमळावे.
- नामाविना साधन करू नये.
- देह कष्टवू नये.
- रामाविना कोणाला सखा करू नये.
- रामसेवा हीच हिताची मानावी.
- मनाने भगवंताचे व्हावे.
- राम सर्व कर्ता आहे हे जाणावे. त्याचा भरवंसा ठेवावा.
- रामरायाचे सन्निध्य राखावे.
- सतत नामस्मरण करावे.
- रामापायी लीन व्हावे.
- राम ठेवील त्यात समाधान मानावे.
- देहाचा कंटाळा करू नये.
- रामावाचून दुसरा भाव ठेवू नये.
- सर्व ठिकाणी रामाचे अधिष्ठान पाहावे.
----------------------
खरा गुरुपुत्र कोण?
- नामाचे चिंतन करणारा
- भगवंताचे ध्यान करणारा
- गुरुआज्ञाप्रमाण मानणारा
--------------------------------
साधकाने काय करावे?
- देहाला प्रारब्धावर सोडावे.
- विषयाला थारा देऊ नये.
- दृष्याला सत्य मानू नये.
- देहासकट प्रपंच रामाला अर्पण करावा.
----------------------------
महाराजांचे आश्वासन - ते म्हणतील तसे वागणारास -
- तो दयाघन तुमच्यावर कृपा करेल.
- रघुवीराला तुमची दया येईल.
- रामाचा वियोग होणार नाही.
- तुम्हाला कोणताही धोका नाही.
- भय-चिंता-दुःख असणार नाही.
- काळजीचे कारण उरणार नाही.
- राम सर्व इच्छा पूर्ण करेल.
- राम दूर होणार नाही.
- भगवंत जोडला जाईल.
- मी तुम्हाला सोडणार नाही.
- तुम्हाला समाधान मिळेल.

॥श्रीराम समर्थ॥