वेदाप्रमाणे नामही अनादी, अनंत, अपौरुषेय आहे.
-----------------------------------------------------
शास्त्रांनुसार (मोक्षासाठी/परमात्मप्राप्तीसाठी) युगाला उचित साधन -
- कृतयुगामध्ये ध्यान हे साधन
- त्रेतायुगामध्ये हवन हे साधन
- द्वापरयुगामध्ये देवतार्चन हे साधन
- कलियुगामध्ये नामस्मरण हे साधन.
---------------------------------------
नामस्मरण हे साधन कोणी कसे सिध्द केले?
- संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि सांगितले की साडेतीन कोटी जपाने चित्तशुध्दी होते आणि १३ कोटी जपाने भगवंताचे दर्शन होते.
- वेदांना जे अगोचर असे परमात्मस्वरूप संत तद्रूपत्वाने जाणतात.
- सध्याच्या संयमहीन परिस्थितीमध्ये नामानेच तरणे शक्य होईल...असे त्यांनी कळवळून सांगितले आहे.
--------------------------------------
नामाचे महत्व -
- नाम वेदांप्रमाणे भगवंताचे अस्तित्व प्रकट करते.
- वेदारंभीचे "हरि ॐ" हे नामच आहे.
- वेदांप्रमाणे नामही अनादी आहे.
- वेदांप्रमाणे नामही अपौरुषेय, व अनंत आहे.
- प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून नाम हे अनादी साधन आहे.
- नामाला आहारविहाराची बंधने नाहीत.
- नाम घेतले तरच वेदांचा अर्थ कळेल.
--------------------
नाम कसे घ्यावे?
- वैदिक कर्मे चित्तशुध्दीसाठी करावीत मात्र त्यांच्यावर पूर्ण विसंबू नये. जोडीला भगवंताचे नामही घ्यावे.
- नाम घेताना लक्ष भगवंताकडे असावे.
- शास्त्राविरुध्द वर्तन करू नये.
- आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो. पण आपली जर अनन्यता असेल तर तो पोटभर पुरवतो.
- नाम इतक्या तन्मयतेने घ्यावे की "मी नाम घेतो आहे" हे सुध्दा विसरून जावे.
॥श्रीराम समर्थ॥