गुरू आपल्याला अंतिम सुख दाखवतात.
------------------------------------------
सर्वसामान्य साधक कसे असतात?
- ते गुरुजवळ विषय मागतात.
- साधक चांगले शिकले-सवरलेले, वयस्कर तरीही त्यांना विषयांत उडी घ्यावीशी वाटते.
- "गुरुला समजतच नाही" असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल जाते.
- सध्या दिसते तेच सुख असे ते मानीत असतात.
----------------------------------------
गुरू/संत/सत्पुरुष कसे असतात?
- विषय शिष्याला दिले तर तो त्यात बुडून मरेल हे त्यांना माहीत असतं. ते त्याला विषयातून वाचवण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतात. शिष्याने तेही ऐकले नाही तर ते आपत्ती वगैरे आणून आपल्याला धाक दाखवतात. शिष्य त्याबद्दल रडत असला तरी ते त्याला विषयातून वर ओढतच असतात.
- शिष्याचे अंतिम सुख कशात आहे हे त्यांना कळत असते.
- ते त्याला सध्या दिसणार्या सुखापासून परावृत्त करीत असतात.
- गुरू शिष्याला आज्ञा करताना असे पहातो की शिष्याचे मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा प्रयत्न करतो.
- संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते.
------------------------------
भगवंत काय करतो?
- भक्ताची संकटे नाहीशी करतो, म्हणजे त्याला समाधानात ठेवून त्याची प्रापंचिक संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत भक्ताला देतो.
- भक्ताला तो नेहेमी स्मरणात ठेवतो. असे भक्त संतपदाला पोचतात.
- अशा संताला ओळखायला त्याचा थोडा गुण (त्याची भक्ती) तरी सामान्य माणसामध्ये असावा लागतो.
॥श्रीराम समर्थ॥