आधी श्रध्दा, मग कृती, नंतर अनुभव.
------------------------------------------
शिष्याने कसे वागावे?
- आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी पक्की खात्री बाळगावी.
- आपली निष्ठा भगवंतावर ठेवावी.
- भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तरच मनुष्य त्याचे नाम घेईल.
- भगवंतावर श्रध्दा ठेवून काळजी न करता स्वस्थ रहावे.
- परमार्थात श्रध्देशिवाय चालत नाही.
- श्रध्देनेच शिष्याच्या अंगी पात्रता येईल.
- संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रध्दा ठेवावी. अशी श्रध्दा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. असा माणूस सुखी होतो.
- स्वतःशी प्रामाणिक व्हावं.
- पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावं, आणि मग निश्चयाने आणि श्रध्देने त्याच्या साधनात राहावं.
- परमात्म्याजवळ असं मागावं," तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुजजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस, नामामध्ये प्रेम दे, आणि तुझ्या चरणी दृढ श्रध्दा सतत टिकू दे."
॥श्रीराम समर्थ॥