२४ जुलै

सद्‌गुरुला शरण जावे.
----------------------------
देव कसे असतात?

- गुरू प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरू कसाही असला तरी प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते.
- गुरू सांगेल ते साधन आपण करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते.
- साधक समाधानी-अनन्य असला की देव त्याला उचलून घेतो.
-----------------------
संत कसे असतात?

- गुरू हे देहात कधीच नसतात.
- गुरू फक्त नामाबद्दलच बोलतात.
- जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरूला देखील आपले स्वतःचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
- संत एकच देव, एकच साधन आणि एकच गुरू मानला.
- शिष्य विषयांत राहिल्यामुळे रडत असला, दुःखात असला तरी संत त्याला सोडत नाहीत.
- संत भगवंताविषयीच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेले असतात.
- ज्या घटकेला शिष्याची चित्तशुध्दी होते, त्या घटकेला त्याला संताची खरी प्रचीती आली असे समजावे.
-----------------------------------
शिष्याने कसे वागावे?

- देवाच्या प्राप्तीकरता कष्टाची तयारी ठेवायला हवी.
- संत सांगतात तो मार्ग चोखाळून पहावा.
- गुरू सांगेल तेच साधन मानावे. त्यातच सदा राहावे.
- गुरूला अनन्य्शरण जाऊन, तोच सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानीत जावा.
- आपण एकाच नामात राहण्याचा प्रयत्न करावा.
- सत्संगतीमुळे साधन करण्याचे कष्ट होत नाहीत. सत्संगतीमुळे आपल्या ठिकाणचे दोष कळतात आणि लवकर सुधारणा होते.
- आपल्या गुरुने सांगितलेल्या साधनाचे आचरण ही त्याची संगतीच आहे.
- आपले चित्त शुध्द होणे ही आपल्या गुरुची प्रचीती आहे हे समजावे.

॥श्रीराम समर्थ॥