साधन-चतुष्टय
-----------------
परमार्थाचा पाया घालण्यासाठी साधनांचा पाया घालावा.
शास्त्राने सांगितलेले साधन -
१) नित्यानित्यवस्तुविवेक करावा
- अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत उदास व्हावे.
- नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे.
२) या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी.
३) आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते; तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा, हर्षविषाद न मानत संतोषाने राहावे.
४) भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूभेटीची खरी तळमळ लागावी.
---------------------
ब्रह्मदर्शन केव्हा होते?
- जेव्हा वरील सर्वसाधनसामग्री असेल
- कडकडीत वैराग्य असेल
- पैशाचा लोभ पूर्णपणे गेला असेल
- मनामधली कामवासना पूर्णपणे गेली असेल
- मोह संपूर्ण गेला असेल
------------------------------
प्रपंची साधकाने आपला प्रपंच कसा करावा?
- भगवंताची उपासना करुन त्याची प्राप्ती करून घ्यावी.
- त्यासाठी नाम हा सोपा उपाय आहे. नामामध्ये फार मोथे सामर्थ्य साठवलेले आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल, त्याला व्यवहारामध्ये नेहेमीच यश येईल असे नाही, पण भगवंत त्याची लाज राखील.
- प्रपंचातील यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. एका डोळ्यात सुखाचे अश्रू आणि दुसर्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे.
- रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते.
- प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते.
- शहाण्या माणशाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरावाईट जसा प्रसंघ येईल त्यात सामील होऊन जावे.
- जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे.
महाराजांचे आश्वासन -
- नाम घेणार्याचे राम कल्याण करतो, एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरु नका.
॥श्रीराम समर्थ॥