२७ जुलै

आपण मागावे फक्त एका रामाजवळ.
----------------------------------------
प्रापंचिक सामान्य व सगुणोपासना -

भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन, त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा, हे सगुणॊपासनेशिवाय सामान्य स्त्री-पुरुषाला समजणे अशक्य आहे.
-------------------------------
रामभक्ताने काय करावे?

- आपल्या जीवनातील प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी.
- आपले जगणेदेखील त्याच्या सेवेसाठी असावे.
- रामरामा आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकासारखा वाटावा.
- जगात घेडून येणार्‍या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे जाणावे.
- व्यवहारदृष्ट्या योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले-वाईट फळ मिळेल, ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रध्दा ठेवावी. अशी श्रध्दा ज्याच्यापाशी असते, त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही.
- सर्वकाही राम करतो, खरे कर्तेपण रामाचे, हे नीट लक्षात आणून, भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे.
- आपण रामापाशी मागावे. तो देईल अथवा न देईल. जे देईल त्य़ांत समाधान मानावे. दुसर्‍या कोणाहीजवळ आपण काही मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणार्‍याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये.
- तोंडाने नेहेमी "राम राम" म्हणत जावे.
- कोणत्याहॊ कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवावे.
- गाईचे रक्षण व इअतर सेवा ही भगवंतासाठी करावी.
- ही जाणीव राहण्यासाठी सतत नाम घ्यावे.
----------
महाराजांचे कळकळीने सांगणे -

माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही. माझ्या गुरूंनी मला नामच दिले, तेच मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. भगवंताच्या नामामध्ये जिवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीतजास्त स्त्री-पुरुषांनी घावे.
- कलियुगात भगवंताच्या नामाचे माहात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच; पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील, तो प्रत्येक संकटातून सहीसलामत पार पडेल यात शंका नाही.
- म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे.
- जगाचा नाद सोडावा आणि भगवंताचे प्रेम जोडावे.

॥श्रीराम समर्थ॥ -