नाम घेणाराच्या मागेपुढे मी उभा आहे.
-------------------------------------------
महाराजांना कोण जाणू शकले/शकतील?
- नामामध्ये जे स्वतःला विसरले/विसरतील त्यांनाच महाराज खरे कळाले/कळतील.
-----------------------------
महाराजांकडे जाणार्या साधकांबद्दलची महाराजांची व्यथा -
- जाणारे लोक स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी जायचे/जातात.
- प्रपंचाच्या आसक्तीने दुःखपरंपरा येते हा अनुभव दररोज येत असूनही प्रपंचात आसक्ती लोक ठेवतात.
- प्रपंचात मनासारख्या गोष्टी मिळत नसूनही लोक अमुक हवे, अमुक नको असे लोक म्हणतात.
- लोक रामाजवळ विषय मागतात...त्यांना रामापेक्षा विषयाचेच प्रेम जास्त आहे.
- महाराजांना येण्यासाठी लोक मनात वाट मोकळी ठेवीत नाहीत.
-----------------------------------
महाराजांची-रामाची कृपा व्हावी यासाठी साधकांनी कसे वागावे?
- आपले कुठे चुकते ते पहावे आणि जे चुकते ते सुधारावे.
- अमुक एक हवे असे मागू नये, रामाचेच होऊन राहावे.
- महाराज येण्यासाठी वाट मोकळी करावी त्यासाठी सतत नामस्मरणात रहावं.
- आपला कधी ना कधी उध्दार होणारच असल्याने महाराज कधी आपल्याबद्दल निराश होत नाहीत. आपण भगवंताचे नाम घ्यावे यापलीकडे खरोखर महाराजांना दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस महाराज त्यांच्या माणसांना (आपल्याला) हेच सांगत असतात की वाटेल झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका.
- नामाचे प्रेम असणाराच "मी महाराजांचा आहे" असं म्हणतो.
- जीवनामध्ये घाबरू नये, धीर सोडू नये आणि नाम घ्यावे.
- ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागेपुढे महाराज उभे आहेत. त्याच्याजवळ महाराज आहेत (ते कसे याचा विचार करू नये). साधकाने फक्त नाम घ्यावे. बाकीचे महाराज करतात.
- साधकाने शुध्दीत असताना नाम घेतले तर झोपेत आणि बेशुध्दीत नाम घेण्याची जबाबदारी महाराज घेतात व ती सांभाळतात.
॥श्रीराम समर्थ॥