२९ जुलै

मला कुणाचे दुःख पाहवत नाही.
------------------------------------
महाराजांचा स्वभाव -

महाराजांना काय आवडत असे?
(अजूनही आवडते)-

- पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे.
- विकतचे श्राध्द घ्यावे. स्वतःचा प्रपंच करता आला नाही; तरी दुसर्‍याचा प्रपंच चांगला करावा.
- जवळ एक पैसा नसून व खाणारी पुष्कळ माणसे असून कधी काळजी न करावी.
- पैशासाठी कुणापुढे जीभ न विटाळावी.
- कोणी गुपचुप पैसे दिले तर ते विष्ठेसारखे बाजूला सारून स्वतःच्या श्रमाने चार आणे मिळवून पोट भरावे.
- एक लंगोटी घालावी, मारूतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी, आणि अखंड नाम घ्यावे.
- नामाचा हट्ट सोडू नये.
- गरीबांचे असूनही प्रपंचात दैन्य आवडू नये.
- दुसर्‍याकरीता निःस्वार्थीपणे भीक मागताना लाज न वाटावी.
- कुणाचे दुःख न पाहावे.
- येणार्‍या माणसाला माहेरी आल्यासारखे वाटावे. परत जाताना त्याच्या डोळ्यांत पाणी यावे. दुसर्‍याला आधार वाटावा.
----------------------------
महाराजांच्या साधकांकडून असलेल्या अपेक्षा व आशीर्वाद -

- अन्नदान करावे, नाम घ्यावे - त्याला हयातीत कधी कमी पडणार नाही.
- महाराजांच्या स्मरणात प्रपंच करावा - त्याच्या प्रपंचात महाराज असतील.
- प्रपंचात हेळसांड करू नये. जास्त दक्षता दाखवावी.
- कमी पडलं तर काळजी करू नये.
- जास्त असेल तर त्याविषयी ममत्व ठेवू नये.
- येईल तसा खर्च करावा - असे करणारा मनुष्य ते सर्व महाराजांना देतो.
- भगवंताच्या नामाला सोडू नये. - रामराया तुमच्यावर कृपा करेल.
- साधकाच्या कष्टांचा मोबदला रामरायाकडून मिळावा.
- सर्वांनी आनंदात राहावे - महाराजांचे आशीर्वाद आहेतच.

॥श्रीराम समर्थ॥