राम कर्ता हे जाणून चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥
---------------------------------------------------------------
प्रपंचात साधकांनी कसे वागावे?
- मी, माजे सोडून द्यावे.
- अभिमान सोडून देण्यासाठी बुध्दी स्थिर करावी.
- आजवर ज्या गोष्टी केल्या त्या कशाही भल्या-बुर्या असू देत, त्याचा विचार करू नये.
- पुढे चूका होऊ नयेत यासाठी खबरदार असावे.
- परस्त्री मातेसमान मानावी.
- दुसर्याचे उणेपण पाहू नये.
- परनिंदा टाळावी.
- स्वतःकडे दृष्टी वळवावी.
- गुणांचे संवर्धन करावे.
- दोषांचे उच्चाटन करावे.
- प्रपंच सुखाचा मानू नये.
- प्रपंच कर्तव्याचा समजून करावा.
- प्रपंचातून सुख मिळेल ही इच्छा सोडून द्यावी.
- जसे घराजवळचा वृक्ष घरातल्या सर्व घडामोडी पहातो मात्र त्यात गुंतत नाही तसे वागावे.
- उदास राहू नये.
सदा समाधान राखावे.
-------------------------
साधकाने रामाला कसे भजावे?
- बुध्दी स्थिर करण्यासाठी नामावर अनावर प्रेम असावे.
- राम कर्ता हे चित्ती जाणावे.
- अखंड अनुसंधान असावे.
- चित्ती रघुवीर भजावा.
- भावें रघुपती धरावा.
- आपला आधार रघुवीर असावा, त्यामुळे संकटे दूर जातात, दुर्जनांची कुसंगत जाते.
- मुखीं भगवंताचे नाम असावे.
- नामावर प्रेम असावे.
- हृदयी रघुवीर धरावा.
- रामावाचून दुसरा विचार आणू नये.
महाराजांचा आशीर्वाद- असे केल्याने चक्रपाणि कृपा करील हाच माझा आशीर्वाद आहे.
॥श्रीराम समर्थ॥