आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ.
------------------------------------------
प्रपंच -
- प्रपंच व शरीर हे साधन आहे.
- प्रापंचिक त्यालाच साध्य मानतो.
- प्रापंचिक "मी कर्ता’ म्हणून प्रपंच करतो.
- प्रपंच दुःखरूप आहे, तो सुखरूप होऊ शकत नाही.
- प्रपंच अर्धवटच आहे.
- प्रपंचात प्रापंचिक खूप कष्ट करतो, कष्टाइतका मोबदला मिळत नाही तरी कष्ट करतो.
- आयुष्यभर प्रपंच केल्याने मृत्यूसमयी प्रपंचच आठवतो.
- प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणारच.
-----------------------------------
साधकाने प्रपंच परमात्मप्राप्तीसाठी कसा करावा?
- "मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निःसंग आहे," ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा.
- "राम कर्ता" मानून प्रपंच करावा.
- परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण ते अखंड करावे.
- परमार्थ जितका करावा तितके समाधान अधिकाधिक असते हे अनुभवावे.
- आयुष्यभर परमार्थ केला तर मृत्यूसमयी तोच आठवेल.
- प्रपंचातील वस्तूंबाबत अलिप्तपणे वागावे.
- ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी.
- प्रपंचात काही प्राप्त झाले तर हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा.
- देह प्रारब्धावर टाकावा.
- आपण रामाचे व्हावे.
- राम ठेवील तसे समाधानाने राहावे.
- हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे, तो ज्याचा त्याला देऊन मोकळे व्हावे.
- सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही, असे समजून ईश्वरार्पण व्हावे.
- आपण सुखी होण्यासाठी भगवंताचे व्हावे.
- अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो, ते प्रपंचातून निवडून काढून टाकले म्हणजे सारे सुखच उरते!
॥श्रीराम समर्थ॥