आपल्याला सद्गुरुचा आधार वाटावा.
---------------------------------------
संत कसे असतात?
- संतांमध्ये अहंकार जिवंत राहत नाही, कारण "परोपकार" करायला लागणारा "पर" च ठिकाणावर नसतो, त्यामुळे "दुसर्याकरीता मी काही केले" ही भावना व्हायला आधारच राहत नाही.
- संत कधीकधी आपल्याला विषय देतात हे खरे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
------------------------
संतसंगती कशी करावी?
- तीर्थयात्रा व साधुसंतांची भेट या निमित्ताने आपल्या अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होते.