साधना

मूळ ग्रंथामध्ये या महिन्यातील ३१ प्रवचने "साधन" या विषयावरील आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

॥श्रीराम समर्थ॥

मनुष्याने प्रपंचात कसे वागावे?
--------------------------------
संतांचे वैशिष्ठ्य -
- ते कर्तेपण रामाकडे देतात.
- "राम कर्ता" म्हणले की सुख, कल्याण आपोआप येते/मिळते.
- संत सर्व रामावर सोपवतात आणि आनंदात राहातात.
- त्रिवेणी संगम आहे - देव+भक्त+नाम
- देवाचे नाम घेतल्यानेच देव आपलासा होतो.
-------------------------
प्रापंचिकाचे वैशिष्ठ्य -
- "मी कर्ता" असे तो मानतो.
- त्याचे हित करणाराही तोच असतो आणि अहित करणाराही तोच असतो.
- कितीही ठरवले, काळजी घेतली तरी आजारपण व दुःख तो टाळू शकत नाही.

नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावे.
----------------------------------------
प्रापंचिकाने साधूला कसे ओळखावे?
- आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला ते पहावे.
- आपल्या मनाला काही वेळ तरि शांति मिळाली, थोडतरी मीपणा कमी झाला, मन निर्विषय झाले, निदान निर्विषय रहावे असे वाटू लागले तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे.
------------------------
साधू कसे असतात?
- ते सर्वाभूती भगवद्‌भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे पहातात.
- त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात.
- साधूचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेदपचीती येते.

संत सांगतील तसे वागावे.
-------------------------------
प्रापंचिकाचे दुःख -
जगात वावरताना तो "माझे, माझे" म्हणतो.
प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा विचार करीत नाही.
मिळण्याची आणि मिळवण्याची हाव हेच त्याच्या दुःखाचे कारण असते.
--------------------------------
साधकाने कसे वागावे? काय करावे?
- ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा.
- मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे.
- भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा परमार्थ मानावा.
- जगाला फसवू नये, आपण जगाकडून फसवले जाऊ नये.
- नामाची संगत हीच सत्संगती असते.

मायेच्या तावडीतून सुटण्यास नाम हेच साधन
------------------------------------
माया-
साधकाच्या मनात असूनही भगवंताचे नामस्मरण घडत नाही याचे कारण माया आड येते.
माया ही भगवंताच्या सावलीसारखी आहे.
माया ही राहणारच.
मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही.
तिला स्वतंत्र शक्तीही नाही.
मायेची सत्ता भगवंतावर नाही.
माया भगवंताच्या अधीन आहे.
सर्व विश्वच मायारूप आहे.
हे विश्व भगवंताची छाया आहे.
या विश्वाला आधार परमेश्वरच आहे.
----------------------------------------
माया आपल्याला भगवंताची भेट कशी घडवून देईल?

नामाने सद्बुध्दी उत्पन्न होते.
--------------------------------
सध्याचा काल -
- मांजर उंदराशी खेळते त्याप्रमाणे काल आपल्याशी करतो आहे.
- तो आपल्याला आशेत गुंतवील आणि पुढे जाईल.
- साधकाने कोणत्याही आशेत न गुंतता अनुसंधान ठेवावे.
--------------------------------
नामावताराचे महत्व -
सगुणरूपी अवताराने वासना किंवा बुध्दी पालटण्याचे काम होऊ शकणार नाही.
सध्या नामावताराची जरूरी आहे.
नाम म्हणजेच भगवंत आहे.
ते नाम अनन्य होऊन आपण घेऊ या.
-----------------------------
साधकाने काय करावे?

साधकाची दिनचर्या
----------------
- साधकाने सूर्योदयापूर्वी उठावे
- जाग आल्यावर नाम घ्यावे

साधकाने कसे राहावे?
--------------
- थोडासा सुध्दा वेळ वाया न घालविता साधन करावे
- रात्रंदिवस पापाला भ्यावे.

साधकाने अभ्यास कसा करावा?
------------------
- अभ्यास विवेक व वैराग्ययुक्त असावा.
विवेक (आत्म [जे जे नित्य-आनंदरूप-अविनाशी आहे ते], अनात्म[जे जे अनित्य विनाशी-सुखदुःखकारक आहे ते] विवेक [या दोन्हीतील फरक समजणे])

साधनांचे प्रकार
------------------
[संदर्भ - चरित्र, पान ६३३]
-----------------
साधने अनंत प्रकारची आहेत -
१) तीर्थयात्रा
२) दानधर्म
३) वेदशास्त्राध्ययन
४) अष्टांगयोग
५) सिध्दि प्रसन्न

Syndicate content