नामसाधना

संत "तू भगवंताचा आहेस" ही जाणीव देतात.
------------------------------------------------
नाम कसे घ्यावे?

- आपण नाम कशाकरीता घेतोय त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याला अनुसंधान म्हणतात.
- "मी विषयाचा नाही, मी भगवंताचा आहे" ही जाणीव संतांकडून आपल्याला मिळते. त्याकरीता ते नाम घ्यायला सांगतात.
- ही जाणीव टिकवण्याकरीता, मनाला तेचतेच पुन्हा सांगावे लागते, म्हणून नाम सतत घ्यायचे असते.
- भाव ठेवून नामसाधन करावे, म्हणजे भगवंताची प्राप्ती लवकर होते.

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे.
-------------------------------------
वाकडा/आड मार्ग कुठला?
- विषयात राहाणे.
- भगवंत व आपण या मध्ये हा आडवा असलेला भवसागर अपार आहे. त्यातून आपल्या कष्टाने पार होता येत नाही.
- त्या मार्गाने जाऊन भगवंत मिळायचा नाही.
--------------------------------
सरळ मार्ग कुठला?
- नामात राहाणे हा सरळ मार्ग आहे.
- त्यात पडून राहिले की कुणीतरि संत भेटतो आणि आपले काम करतो (आपल्याला भगवंत भेटवतो).
-------------------------
या मार्गात साधकाने कसे राहावे?
- घरून जर विरोध होत असेल तर गुपचूप नाम घ्यावे.

नामाविषयी शुध्द भाव आवश्यक
----------------------------------
प्रापंचिक -
- प्रापंचिक मनुष्य विषयसुख चिरकाल टिकणारे आहे अशी समजूत करून घेतो.
- त्याचा स्वार्थ, त्याचे विषय ईश्वरप्रेमात आड येतात.
- त्याला मुळात काय पाहिजे आहे हेच कळत नाही.
- विषयांचे चिंतन करून काही हाती लागत नाही तरी तो त्यांना सोडत नाही.
- उपवासाच्या दिवशी भगवत्‌स्मरण करायचे सोडून सगळे करतो.
- त्याच्या देहावर त्याची सत्ता नसते
- त्याच्या पैशावर त्याची सत्ता नसते
- त्याच्या माणसांवर त्याची सत्ता नसते
--------------------------------
भगवंत कसा आहे?

जेथे नाम, तेथे मी आहेच.
---------------------------------
ज्ञान मार्ग -
हा अत्यंत कठीण आहे.
त्यात अभिमान नष्टह होण्यापेक्षा वाढण्याचाच संभव जास्त असतो.
ब्रह्म सत्य जगन्‌ मिथ्या हे त्यांच्या अनुभवाला येत नाही.
नुसत्या विचाराने देहाचं मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे.
------------------
कर्ममार्ग - (वैदिक कर्मकांडे)
ते बंधने आणि नियम यांचे इतके पालन करतात की बंधनालाच सर्वस्व मानतात.
भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणात होते.
वेद म्हणजे देवाची स्तुती. ते म्हणताना भगवंताकडे लक्ष असावे.

नामीं ठेवावे चित्त । तेंच मानावें सत्य ॥
---------------------------------------------
प्रारब्ध -
- प्रारब्धानुसार देहाची गति व स्थिती असते.
- आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळते
- देहाची गति पालटणे कोणालाही शक्य नाही.
- प्रारब्धातून कोणी (साधुसंत-देवादिक सुध्दा) सुटत नाही
- सुख-दुःख प्रारब्धयोगाने येते.
- जीवनातील आघात प्रारब्धाच्या अधीन असतात.
--------------------------
साधकाने काय करावे?
- सुख-दुःख दोन्हींमध्ये गुंतू नये
- नामाची आवड ठेवावी
- चित्त भगवंतापायी ठेंवावे
- रघुनाथाला स्मरताना देहभोगाचे कष्ट होत नाहीत

काळजी करायचीच तर नामाची करा
-------------------------
काळजी -
- काळजी हा मोठा रोग आहे
- वासना व अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत.
- एकच स्थिती कधी कायम राहात नाही म्हणून आपल्याला भीती वाटते, आणि तिच्यातून काळजी निर्माण होते.
- काळजी आपल्याला मारते, तरी आपण तिला घट्ट धरून बसतो.
- काळजीमुळे हृदयात आनंद निर्माण होत नाही.
- जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारणीभूत होतात, त्या सर्वंचा संग्रह म्हणजे काळजी
- जोपर्यंत "मी कर्ता आहे" ही भावना आहे, तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात.
----------------------------
काळजीवर उपाय काय?

भगवंताचं नाम कसं घ्यावं?
-----------------
- वैखरीतून सतत नाम घेतलं जावं
- काम-क्रोधाचा प्राण घ्यावा
- मग सतत रामनाम जपावे कसे?

Syndicate content