श्रीतुकामाई

जवळजवळ ६ वर्षांनी म्हणजे २७ ऑक्टोबर २०१० मध्ये काही सज्जनांबरोबर अचानक संतांच्या स्थानांची भेट घेण्याच्या उद्देशाने विशेषतः महाराजांच्या गुरुपरंपरेतील गुरुस्स्थानांचे दर्शन घ्यावे व त्यांचे आशीर्वाद घ्यावे असे मनात योजून येहळेगावला जाणं झालं.

श्रीतुकामाईचे महानिर्वाण
-------------------------
सन १८८७ जून महिन्यात रात्री, ज्येष्ठ महिन्यात शुध्द अष्टमीस शुक्रवारी येहळेगाव येथे श्रीतुकामाईंनी देह ठेवला. त्यावेळी ते ७४ वर्षांचे होते.

श्रीतुकामाईंचे अंतरंगातील शिष्य
----------------------------------
खर्‍या जिज्ञासूशी ते फारच प्रेमळपणे वागत असत.
त्यांचे बोलणे गूढ असे, पण ज्याच्यासाठी ते असे त्याला ते बरोबर समजे.
ज्याचा त्याचा अधिकार पाहून तुकामाई योग/भक्ति/दानधर्म/तीर्थयात्रा करायला सांगत.

श्रीतुकामाईंचे गुरुबंधू
-------------------------
१) गोचरस्वामी

हे संन्यासी होते व ते आपल्या गुरुगृही उमरखेडलाच राहिले

२) रावसाहेब शेवाळकर

हे गृहस्थाश्रमी होते व कळमनुरी येथे भजन व अन्नदान या निमित्ताने परमार्थाचा प्रसार करीत राहिले.

या तिघांमध्ये अलौकिक असं प्रेम होतं.
श्रीतुकामाईंना ते दादा म्हणत व आपल्या सद्‌गुरुंखालोखाल मान देत.

॥श्रीराम समर्थ॥

श्रीतुकामाईंनी कल्याण केलेले जीव
------------------------------------
श्रीतुकामाई सर्वसामान्य प्रापंचिकांबद्दल म्हणत की
- जो येतो तो आपल्या प्रपंचासाठी
- मला बरं नाही
- माझ्या बायकोला बरं नाही
- मला मूलबाळ नाही

श्रीतुकामाईंचे अंतरंग
----------------------
- हे योगीराज अति थोर महात्मा होते
- नाथपरंपरेमध्ये पहिल्या श्रेणीत नाव शोभेल इतकी योगविद्या श्रीतुकामाईंजवळ होती.

श्रीतुकामाईंची बाह्य स्थिती
----------------------------
श्रीतुकामाईंचे बाह्य रूप
- पिवळसर गोरा वर्ण
- आजानुबाहु
- भरलेले शरीर
- प्रसन्न व शांत मुद्रा

श्रीतुकामाईंची कुमारावस्था
----------------------------
- श्रीतुकामाई १२-१३ वर्षांचे असताना एकदा त्यांनी वडिलांना विचारले की," तुम्ही रोज डोळे झाकून बसता तेव्हा काय करता?"
तेव्हा वडिल म्हणाले की," मी माझ्या गुरुचे ध्यान करतो".
त्यावर श्रीतुकामाई उद‌गारले की,"गुरुचे ध्यान करायला डोळे झाकायलाच हवेत का?"

श्रीतुकामाईंचे बालपण
------------------------
श्रीतुकामाई कसे होते?
- त्यांचे डोळे खूप तेजस्वी होते
- ते आजानुबाहू (गुडघ्यापर्यंत हातची बोटे पोचणे - अवतारी पुरुषाचे लक्षण)) होते.

श्रीतुकामाईंची पार्श्वभूमी
-------------------------
मूळ गाव -
मराठवाड्यात
नांदेडपासून जवळ
यवतमाळ जिल्हा
उमरखेडपासून जवळ
येहळेगाव
येथे त्यावेळी निजामशाही (मोंगलाई) होती.

Syndicate content