गुरुसेवा

गुरुसेवा करणे म्हणजे काय?
-------------------------------
गुरुसेवा म्हणजे काय नाही?

- त्याच्या देहाची सेवा करणे.
- प्रपंचातल्या विषयांसाठी त्याची सेवा करणे.
- उगीचच अभिमान वाढविणार्‍या साधनांची आटाआटा (धडपड) करणे.
- पापकर्म करीतच राहणे.
- आपल्या गुरुचे मनच न कळणे.
- त्याने सांगितलेले न ऐकता आपल्याच मनाने वागणे.
- मला सगळे कळते असे वाटणे.
-------------------------------------------
गुरुसेवा कशी करावी?

- जे जे घडते ते ते गुरुच्या इच्छेने झाले असे समजावे आणि त्यात आनंद मा्नावा.

गुरुवर अत्यंत श्रध्दा ठेवावी.
------------------------------
सर्वसामान्य प्रापंचिक -

- संकटांना घाबरतो.
- तो संकटे परत घेण्याची विनंती परमेश्वराला करतो.
- स्वतःचे अहित करवून घेतो.
-------------------------------------------
साधकाने काय करावे?

- आपली देहबुध्दी कमी करण्यासाठीच परमेश्वर संकटे धाडतो.
- ती परत केल्याने अहित होते. भगवंताला आपले हित कशात आहे हे उत्तम कळते. साधकाने भोग भोगून पुरुषार्थ साधावा. आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते.

महाराजांची अनन्य गुरूभक्ती
-----------------
सद्‌गुरुसाठी वय १२ ते १४ या कुमारवयात महाराज भारतभर शोध घेतघेत हैदराबादकडे आले असता, श्रीसमर्थ परंपरेतील श्रीरामकृष्णांनी त्यांना येहळेगावला जाय़ला सांगितले. महाराज आधी नांदेडला गेले. तिथे त्यांनी गोदावरीत स्नान केले आणि ते येहळेगावच्या दिशेने जायला निघाले.

Syndicate content