महाराजांची अनन्य गुरूभक्ती
-----------------
सद्गुरुसाठी वय १२ ते १४ या कुमारवयात महाराज भारतभर शोध घेतघेत हैदराबादकडे आले असता, श्रीसमर्थ परंपरेतील श्रीरामकृष्णांनी त्यांना येहळेगावला जाय़ला सांगितले. महाराज आधी नांदेडला गेले. तिथे त्यांनी गोदावरीत स्नान केले आणि ते येहळेगावच्या दिशेने जायला निघाले.