मी एक साधनी:
जीवात्मा अनेक जन्मात जी शरीरे मिळवतो त्याविषयी भगवंत काय सांगतात?
माझ्या मनातील सद्गुरु:
ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण-तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीरही मिळते.
या नाशरहित, मोजता न येणार्या, नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत.
शरीर मारले गेले तरी आत्मा मारला जात नाही.
ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसर्या शरीरात जातो.
मी एक साधनी:
जीवात्म्याला कोण जाणतो?