श्रीरामेश्वरम्‌

श्रीरामेश्वरम्‌ - सन २००६ मध्ये नाताळच्या सुटीदरम्यान एक छोटी यात्रा श्रीगुरुनाथ ट्रॅव्हल्सने आयोजित केलेली होती. त्यात मदुराई, श्रीरामेश्वरम्‌ व कन्याकुमारी ही तीर्थे समाविष्ट केलेली होती. मी पर्वणी साधली. माझ्याकडे काशीचे व हरिद्वारचे गंगाजल होतेच. काशी-रामेश्वरम्‌-काशी अशी यात्रा करण्याची संधी पुन्हा येणार नव्हती.

पुण्याहून आम्ही थेट मदुराई गाठले. रात्री हॉटेलमध्ये मुक्काम केला. सकाळी उठून श्रीमीनाक्षीचे दर्शन घेतले. दुपारी भोजन झाल्यावर आम्ही रामेश्वरम्‌च्या दिशेने बसप्रवास सुरु केला. रात्री श्रीरामेश्वरम्‌ला पोचलो. प्रवास्त मला असे कळले की श्रीरामेश्वरम्‌ हे वेगळे बेट आहे जे तामिलनाडूच्या पूर्व किनार्‍याजवळ आहे. ते एका मोठ्या ब्रीजने जोडले गेलेले आहे.

बेटावर आल्यावर हवा बदलली. खारट-दमटपणा नाकात शिरला आणि त्वचेला जाणवला. इथे जमिनीऐवजी रेतीच दिसत होती. हॉटेलवर ताजेतवाजे झालो. रात्री जेवणे झाल्यावर तेथील क्षेत्रोपाध्याय आले. त्यांनी तीर्थाची माहिती सांगितली. कोणती धार्मिक कार्ये इथे होतात ते सांगितले. आम्ही देवळात जाऊन दर्शन होते का ते पहाण्याचा प्रयत्न केला पण मुख्य प्रवेशद्वाराशी सांगितले की देऊळ बंद झाले आणि देव शयनगृहात विश्रांति घेत आहेत. आम्हाला पहाटे ३ ला उठून २ किमि. आत चालत जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे होते. त्यामुळे आम्ही हॉटेलवर परतलो व उद्या लागणार्‍या जिनसांची पिशवी तयार केली.

येथे मला कसे अनुभव आले ते सविस्तर या पानाखालच्या लिंकमध्ये दिलेले आहे.

नकाशा -

medium_map3.jpg

श्रीरामेश्वरम्‌ ब्रीज

medium_rameshwar bridge.jpg

बाहेरुन देऊळ

medium_shrirameshwar mandir.jpg

आतील कमानी

medium_rameshwar mandup.jpg

रामेश्वर समुद्र

medium_tirth-rameshwar.jpg

नंदिकेश्वर

medium_nandi-rameshwar.jpg

श्रीरामेश्वरलिंगम्‌

medium_shrirameshwar.jpg

श्रीपार्वतीमाता

medium_parwatimata.jpg

श्रीमत्‌आद्यशंकराचार्य पीठम्‌

medium_adyaShankaracharyaMatha-Rameshwar.jpg

॥श्रीराम समर्थ॥