काशी /बनारस / वाराणसी

2) काशी /बनारस / वाराणसी (उत्तर प्रदेश)
-------------------------
काशीची माझी पहिली भेट
१९९८ मध्ये काही परिचितांबरोबर मी आयुष्यात पहिल्यांदाच काशीला आणि ती ही मे महिन्यात गेले होते. स्टेशनवर उतरल्यावरच उकळत्या तेलाच्या काहिलीत पाय टाकल्यासारखं वाटलं. काशीपासून काही कि.मी. असलेल्या तिबेट संस्थानातील मोकळ्या विद्यार्थीगृहात आमची राहायची सोय केली होती. रोज दोन वेळा स्नान करणे क्रमप्राप्त होते इतका उष्मा होता.
परिचितांच्या एका नातेवाईकाने आम्हाला काशी दाखवण्याची जबाबदारी घेतली होती. तसल्या उन्हात आम्ही सकाळपासून उशीरा संध्याकाळपर्यंत फिरत होतो.
तेव्हा मला कळलं की एकाच गावाला ही तीन नावे तीन वेगळ्या कारणांसाठी पडली आहेत.
काशी राजाने वसवलेली अतिप्राचीन नगरी म्हणून काशी
वरुणा आणि असी नद्यांच्या संगमावरची म्हणून वाराणसी
बनार राजाने वसवलेली म्हणून बनारस.
सायकलरिक्षातून फिरताना, भोजपुरी भाषा ऐकताना आणि अतिशय समृध्द सांस्कृतिक वारसा असलेली ही भलीमोठी नगरी बघताना, तेथल्या बाजारात हिंडताना मी अगदी रमून गेले होते. पहिल्यांदाच मी लिची हे फळ पोट तुडुंब होईपर्यंत खाल्ले. त्याची मला सलाईनइतकीच गरज वाटली होती.
नावेतून रमतगमत गंगेचे सारे घाट (हे एकाच तीराला आहेत. दुसरा तीर मोकळा आहे) बघताना जे काही वाटलं ते सांगता नाही येणार.
मात्र बरोबरचे पर्यटक लोक धार्मिक नसल्याने माझी गोची झाली होती. मला कोठेही पूजा करता आली नाही. गंगेवर मी स्नान करु शकले नाही. पुण्याला परत आल्यावर मला माझ्या कुचंबणेचा फार त्रास झाला होता. एक महत्वाची संधी मी गमावली, आता पुन्हा काशीला जायची कधी वेळ येतेय कोणास ठाऊक या विचारानं मला उदास वाटायचं.
---------------------------------
काशीची माझी दुसरी भेट -
त्यानंतर जवळ जवळ ७ वर्षांनी गुरुनाथ ट्रॅव्हल्सची त्रिस्थळी यात्रेची माहिती देणारे परिपत्रक घरी आले.
नुकतेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात श्रीरामेश्वरला जाऊन तेथील ज्योतिर्लिंगावर हरिद्वारची गंगा अर्पित केली होती आणि तेथील सागराची वाळू (सेतू) क्षेत्रोपाध्यायांच्या मार्गदर्शनाखाली पूजा करुन पिशवीत घालून घरी घेऊन आले होते. हा सेतू काशीला सशास्त्र बिंदुमाधव व वेणीमाधवाला अर्पण करून काशी-रामेश्वर यात्रेचे पुण्य संपादन करायचा विचार केला होताच.
रामेश्वर यात्रेतील २ कुटुंबे यांच्यासह व इतर ५०-६० जणांबरोबर त्रिस्थळी यात्रा केल्यावर आपण खूप काही पुण्य मिळवलं अशी जी भावना झाली ती खूप काळ मनात रेंगाळली.
मी काशीला जाण्यापूर्वी श्रीव्यासरचित (प्राकृतामध्ये भाषांतरीत) स्कंदपुराण, काशीखंड इ वाचून गेले होते.
तेथे गेल्यावर माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या.
- क्षेत्रोपाध्यायांकरवी गंगामाईची यथासांग पूजा झाली
- गंगास्नान यथेच्छ झाले.
- समन्वयला (माझ्या मोठ्या मतिमंद मुलाला) गंगास्नान झाले.
- आम्ही काशीत त्रिरात्र राहिलो
- क्षेत्रोपाध्यायांकरवी श्रीविश्वनाथाची यथासांग पूजा व स्पर्शदर्शन झाले
- अन्नपूर्णेचे दर्शन झाले
- काशीतली सर्व महत्वाची धार्मिक स्थळे पाहिली. सर्व ठिकाणी पूजा करता आली.
- याखेरीज जे झाले ते त्रिस्थळी यात्रेच्या माहितीत देतेच आहे.

काशी या अतिप्राचीन क्षेत्राविषयी जेवढे लिहावे तेवढे थोडे आहे.
या क्षेत्राविषयी पौराणिक माहिती मत्स्यपुराण, काशीखंड, पद्मपुराण यात दिलेली आहे.
गंगेवरचे घाट -
गंगेच्या तीरावर एकूण ८४ घाट आहेत. त्याविषयी सविस्तर माहिती खालील संकेतस्थळावर दिलेली आहे.
http://varanasi.nic.in/ghat/ghat.htm
मणिकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट हे प्रसिध्द आहेत.
--------------------------------------
काशीमध्ये खूप देवळे प्रसिध्द आहेत.
त्यातील महत्वाची म्हणजे

१) श्री विश्वनाथ

medium_Kashi-vishwanath.jpg

२) अन्नपूर्णा

medium_annapurnadevi.jpg

३) संकटमोचन हनुमान

medium_hanuman-kashi.jpg

४) कालभैरव (काशीचा क्षेत्रपाल)

medium_kalbhairav-kashi.jpg

५) ढुंढिराज गणपती

medium_dhundiraj-Kashi 001.jpg

६) तुलसीमानस मंदिर

medium_IMGP0455.JPG

७) नवीन विश्वनाथ मंदिर (पं. मदनमोहन मालवीय यांनी स्थापिलेले)

medium_madan mohan malaviya.jpg

८) सारनाथ (http://www.sacred-destinations.com/india/sarnath.htm, http://en.wikipedia.org/wiki/Sarnath)

9) कवडी आऊबाई (हिचे दर्शन घेतल्याशिवाय काशी यात्रा पूर्ण होत नाही)

॥श्रीराम समर्थ॥